बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

'' रावण ''

माणसा तुला चांगला माहीत आहे
मी कधीच जळत नाही....
तरी दरवर्षी जाळतोस मला
विजयाचे ढोल बडवत
माझे दहन करतोस
स्वतःतला अहंकार तसाच ठेवून
माणसा तुला कधीच जाळावा वाटत नाही
स्वतः मधला तो पाशवी पशु
चिमुकल्या कळ्यांवर बलत्कार करणारा
माझ्या जळालेल्या देहातील
अनगिनत ठिनग्या तुला हेच
सांगतयेत ओरडून
मला कितीही जाळ
पण तुझ्यातल्या माणसाला
कधीही जाळु नकोस.....
~ विवेक शिंदे
 

सोमवार, २६ सप्टेंबर, २०१६

" काय विशेष "

तो काल संध्याकाळी भेटला
चहा पाज म्हणाला
मी म्हणालो " काय विशेष "
फुकटचा चहा पियून
" विशेष" टेंशन चा कीड़ा
डोक्यात सोडून गेला....

घरी गाडीवर येताना तोच विषय
जेवताना डोक्यात तोच विषय
रात्री स्वप्नात तोच विषय
सकाळी त्याच विषयाच्या
हैंगओवर ने डोक जड़ पडलेला
सकाळी कामावर निघालो
कालचा तोच फुकटचा चहा पिणारा
पारावार खिदळत गप्पा मारताना दिसला
मी तोंड लपवत पुढ़ निघालो
की त्याने " कालचा विषय लक्ष्यात राहु दया"
राम राम न करता आरोळी दिली
मी "हो" "हो".....
माझ्या कड़ दुर्लक्ष करत
तो परत आपल्या दुनियेत मजेत
मी " त्या विषयाच् " ओझ घेऊन
आयुष्यभर सैरभैर..................
विवेक शिंदे....

समीर गायकवाड : वेध 'शिशिरागमना'चा ......

समीर गायकवाड : वेध 'शिशिरागमना'चा ......: जगाला भले बहारदार 'वसंत' अतिप्रिय वाटत असेल पण मला 'शिशिर' भावतो... शिशिरागमन होताच झाडांची पाने एकेक करून गळून जाता...

गुरुवार, ४ ऑगस्ट, २०१६

चारोळ्या

इवले इवले पावले घेऊन
घरात आली नवी " पाहुणी "
श्रावनातल्या पहिल्या सरीनी ही

तिचे नाव ठेविलें " श्रावणी "
~~~ विवेक शिंदे(१)


  पाउलागनिक तुझ्या पोरी
संघर्ष ठरलेला आहे....
जपून टाक पाऊल प्रत्येक

मानसात ही शैतान भरलेला आहे...
~~~~ विवेक शिंदे (2)


 मुलगी म्हणून जन्माला आले
माझा हयात काय गुन्हा आहे
नीट बघ आई उदरात तुझ्या

आज ही माझ्या "पाउलखुणा" आहे
~~~~ विवेक शिंदे (3)


चारोळ्या

'' रोशनी ''



'' रोशनी ''
''सही बोलताये सही बोलताये टेन्शन काय को लेणे का ? ''
आपल्या वजना पेक्षा जास्त वजनाच्या दोन रिकाम्या  बादल्या नाचवत नाचवत रोशनी मस्त गाणे म्हणत माझ्या समोर उभी ठाकली. शून्यातली माझी नजर हेरून रोशनी ने मला विचारले ,'' भैया what happened you looks so tense  ? '' तिचा मन राखण्यासाठी म्हटलं ,'' nothing angel ''

 '' रोशनी क्या बात हे आज बहोत मूड मे हो? लागता हे ममा घर पे नाही हे ?''
'' हा ममा आज लेट आने वाली हे .पाणी भर के रखने को बोला हे. पर्ल दीदी भी घर पे नही हे .स्कूबी और डेझी को घुमाने ले गयी हे. उन के आने से पहिले पुरा काम खतम कर के आज मस्त  पढाई करूंगी.''
'' और भैय्या आप ऐसे ऑफ मूड मे अच्चे नही लगते चलो हसो हसो ....टेन्शन काय को लेने का भैया मस्त जिने का ''
दोन बादल्या भरून देऊन वरच्या मजल्यापर्यंत तिला नेउन देऊ लागलो तोच ती म्हणाली ''नही भैया मॆ ले जाऊंगी दीदी ने देख लिया तो ममा घुस्सा हो जायेगी '' तिचा ऐकता तिच्या दारापुढे बादल्या ठेवून तिला बाय करून निघून आलो. इवल्याश्या angel ने टेन्शन घेण्याच्या कान मंत्र बरोबर घेऊन फ्रेश होऊन मस्त sunset पाहण्यासाठी रूम मधून बाहेर पडलो.
मेस वरती रात्रीचे जेवण उरकून परत रूम वरती आलो. आज आभ्यास करता मस्त पु वाचवा म्हणून ' आपण सारे अर्जुन' हातात घेऊन रूम बाहेर चकरा मारता मारता पुस्तक चाळू लागलो. तोच बारीक कण्हण्याचा आवाज आला. वाटला वरच्या भाडेकरूंची कुत्री ओरडत असतील म्हणून दुर्लक्ष केला. परत थोड्या वेळाने सेम आवाज आला आता आवाज ओळखीचा म्हणून पुस्तक रूम मध्ये ठेवून आवाजाच्या दिशेने निघालो .आवाज सगळ्यात वरच्या टेरेस वरून येत होता.टेरेस चे दार आतून लावलेले होते.मनात विचार आला आरे दार तर लावले आहे मग आवाज कुठून येतोय? दाराची कडी उघडून टेरेस वर आलो.अंधारात काही दिसत नव्हते  म्हणून लाईट लावून पाण्याच्या टाकी मागे पाहिले तर पायाखालची जमीनच सरकली. क्षणभर काय करावे सुचेना जे पाहिले ते भयानक होते.



इवलीशी रोशनी नग्नावस्थेत हात पाय बांधलेले,शरीर काळा निळा पडलेला आणि शरीरावर चटके दिल्याचे निशाण.
रोशनी वेदनेने तडफडत होती मला पाहून तिचा थोडा जीवात जीव आला पण तिला मोठ्याने रडायची सुद्धा हिम्मत होत नव्हती.थोडासा धीर देऊन तिला विचारले, '' what happend रोशनी ? ममा ने फिरसे मारा तुझे ?''
रोशनी दबक्या आवाजात म्हणाली '' नही नही किसीने नही मारा मुझे भैया आप जावो यहा से ''
मला क्षणात सगळा प्रकार लक्षात आला. ती नको नको म्हणतानाही तिचा हात धरून तिच्या ममा कडे घेऊन गेलो . दाराची बेल वाजवली. तिच्या ममा ने दार उघडली तसे कुत्रे माझ्या अंगावर धावून आले. ती बाई कुत्र्यावर ओरडली  तशी कुत्री लांब जाऊन गुरगुरू लागली. मला विचारले ''क्या बात हे क्यू आये मेरे घर पे ? ''  तिने रोशनी कडे मोठे डोळे करत जोरात खेकसली '' you bastard what you told this unknown person ?'' तस रोशनी माझ्या माग लपवत मी तिला सरळ प्रश्न केला ,''कोई आपनी बच्ची को इस तर्हेसे मारता हे क्या ?बेचारी कितनी डर गयी हे .'' 
तशी ती बाई माझ्या अंगावर ओरडली '' who r u ? why should i answer to your question ? get out from my house '' तसा तिने माझ्या मागून रोशनी ला फरपटत घरात नेले आणि धाडकन दार लावून घेतले.तसा कुत्राच्या आणि रोशनी विव्हालण्याचा आतून आवाज येत होता. तिने आतूनच मला दम देऊन निघून जाण्यास सांगितले .रात्रीचे साडे अकरा वाजले होते.आता ह्या घडीला इथून निघून जाणेच योग्य राहील नाही तर रोशनी ला आणखी मार खावा लागल म्हणून मी तिथून निघालो .
रात्रभर रोशनीचा चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता. परत परत  टेन्शन काय को लेने का म्हणणारा रोशनी चा निरागस रुपडं  आणि वेदनेने रडवेला झालेला तिचा चेहरा माझा पिच्छा  सोडत नव्हता.
          सकाळी उठल्या उठल्या घरमालकीणीला झालेला प्रकार कानावर घालावा आणि ह्या नालायक बाईला त्या काहीतरी तंबी देतील म्हणून भेटायला गेलो तर त्यांनी उलट मलाच गप राहायला सांगितले. ती बाई खूप डेंजर आहे ती  आमदाराच्या मुलाला घरी  इंग्लिश शिकवायला जाते.तिचे मोठ मोठ्या लोकांबरोबर कसले कसले समंध आहेत ते तुला माहित नाही.तिच्या नादी नको लागू थोड्याच दिवसात तिला मी इथून हाकलून देणार आहे. मी मालकिणीला म्हणालो त्या बिचार्या रोशनी ला ती खूप मारते आणि तिच्या मोठ्या मुलीला पर्ल ला काहीच काम सांगत नाही तिला  मारझोड करत नाही अस का ? तेव्हा घर मालकिणीने  मला सांगितले कि रोशनी हि त्या बाई ने दत्तक घेतलेली मुलगी आहे. त्या मुळे ती तिचा इतका तिरस्कार करते. तिला अमाप त्रास देते. मनात प्रशन आला तिला त्रास द्याच होता तर हिने तिला दत्तक का घेतले ?
नंतर रोशनी मला परत दिसलीच नाही दोन आठवड्याने त्या बाई ने घर खाली करून ती तिथून निघून गेली.मधला बराच काळ गेला.आधुन मधून रोशनी ची आठवण येत राहायची मी तिचा पत्ता हि शोधायचा प्रयत्न केला पण ती आता पुण्यात शिफ्ट झाली येव्हडच कळले.
फायनल इयर संपल्यावर मला हि पुण्यात मार्केटिंग चा जॉब लागला .पुण्यातील रस्त्यावरून फिरताना हि डोळे सारखे रोशनी ला शोधायचे पण सहा महिने तिचा काही पत्ता सापडला नाही.



एक दिवस अचानक रस्त्याच्या दुसर्या बाजूला मला शाळेच्या uniform मध्ये पर्ल  cycle वर जाताना दिसली.तसा तिचा पाठलाग करत तिला हाक मारू लागलो.तिने मला पाहून पहिल्या सारखे करून जोरात सायकल दामटली.तिची मैत्रीण तिला थांब थांब म्हणत होती तरी ती थांबाना.तिला कळले असणार मी रोशनी विषयी विचारणार तसा माझा हात झटकून मुझे आप से बात नही करनी अस म्हणत   सायकल ला जोरात टांग मारून ती पुढे निघून गेली. माग मी पर्ल च्या मैत्रिणीला थांबवून रोशनी विषयी विचारले. तसा तिने सेकंदात रिप्लाय दिला. '' you  dont  know ? she is no more !!! वो बेचारी जल के मर गयी.उसकी ममा ने उसे बचा ने कि बहोत कोशिश कि उस बेचारी के भी हात जल गये ... उसकी ममा बहोत अच्ची हे अब पर्ल से बहोत प्यार करती हे. ओके बाय ...''   
mute mute mute mute ........................   

 सदर घटना माझ्या आयुष्यात घडलेली सत्य घटना आहे जी आठवली कि मला आज हि रोशनी ला वाचवू शकल्याच दुक्ख मनाला बोचत राहते ....
**  विवेक शिंदे
अहमदनगर
   

'' ओझ ''



'' ओझ ''

स्कूल व्हन चा होर्न वाजला तसा शालिनीच्या कामाचा वेग आणखीनच वाढला.दिवसभर शांत शांत असलेला घर सोहमच्या धडाकेबाज एन्ट्री ने मोहरून गेला. सोहम ने पायातील श्युज आणि सॉक्स चारही दिशेला भिरकावले. स्कूल ब्यग  एका सोफ्यावर तर तलवारी सारखी water bag  भिरकावत पूर्ण स्वयंपाकघरावर कब्जा मिळवून शालिनी ला घट्ट मिठी मारली.
''मम्मा मम्मा आज स्कूल मध्ये आम्ही खूप धमाल केली .''
''ओके डीअर,चल पटकन हात पाय धून घे तुझ्या साठी मस्त तुझे आवडते sandwich बनवलेत. आधी खावून घे आणि मग मला सगळ्या गमती जमती सांग.''
''वॉव यम्मी ,मम्मा यु आर ग्रेट.'' 
मस्त sandwhich वर ताव मारून सोहम खेळायला गेला तशी शालिनी परत रात्री च्या जेवणाच्या तय्यारी ला लागली. दिवसभर च्या ह्या संसारच्या रहाटगाडग्यात शालिनी पूर्णपणे पिसून निघत होती. घराबरोबर आपल्या नवरा आणि मुलांचा स्टेटस च हे ओझा पेलवता पेलवता बिचारीचा स्वतःचा आयुष्य आहे हे विसरूनच गेली होती.
दूर गावाच्या शिवारावर डोक्यावर गवताचे भारे घेऊन संगी अल्की आणि सुभ्या वेगाने बाजाराच्या दिशेने झपझप पावलं टाकत निघाले.
सुभ्या ,'' आये लई कळ लागली पाठीला कधी येणार बाजार मला भूक बी लागलीया...''
संगी,'' सुभ्या थोडी कळ सोस पोरा बघ ती अल्की बी उपाशी हाये ती कशी गपगुमान चालली बघ,लवकर गवत इकला कि तुला खायला घेईल काहीबाही .चाल भराभरा बाजार संपायच्या आत जावा लागल .''
तिघांची अनवाणी पावलं बाजाराच्या दिशेने जोरात निघाली तोच बुलेट च्या धूड धूड आवाजाने तिच्या हृदयाची धड धड वाढवली. संगीच्या मनातील शंका खरी ठरली जमीनदाराचा तात्या बुलेट चा वेग कमी करून संगी ला आडवा उभा राहिला .कधी अल्की कधी संगीला न्याहाळत होता.तस संगीन पदर नीट केला आल्की न बी तोंड लपवला.
तात्या,'' काय संगे लई माजलीस काय आमच्या जीवाव्वर जग्तीस आमच्या रानातला गवत इकायला न्हेतीस आन आम्हाला उपाशी ठेवून बाजाराला चाललीस व्ह्य ?''
तात्या ची अल्की वरची नजर हाटत नाही हे पाहून संगी च उर जोरजोरात धडधडायला लागला.संगी ला ह्या गिधाडाची वाईट नजर आणि सवयी माहित होती .
तशी परिस्थितीला हाताळत संगी तात्याला लाड लाड म्हणाली ,'' मालक येव्हड्या बारीला जाउन द्या पोर उपाशी हायेत सकाळ धरन पोरांनी काही बी नाय खाल्ला ,आम्ही गरिबान कधी तुम्हासन नाय म्हटलं का ?''   
तात्या,'' काय अल्के बरी हायेस का? भूख लागली व्हय चाल बस गाडीवर वडापाव चारतो. ''
तस संगी ने अल्की चा हात जोरात पकडून जोरात पुढे चालायला लागली.
तात्या, '' अल्के शब्द लक्षात ठेव''  आणि बुलेट चा वेग वाढवून तात्या अल्की कड बघत कुचक हसून जोरात निघून गेला.
संगी न एक शिवी हासडून पोरांवर ओरडली  , '' चला र भरभर बाजार संपल तिकड.''
संकट सावली सारखे तिच्या माग माग बाजारात चालत होती. बाजारात पोहचत नाही तोच ठेकेदार समोर उभा. तीन गाठोड्याचे हातावर  १०० रुपये टेकवून मागची उधारी कापून घेतली. डोक्याला हात लावून आपल्या नशिबाला शिव्या देत तशीच सुन्न होऊन बाजारात बसली.तिघांचा चेहरा हि रडवेला झालेला.सगळे डोळ्यातला पाणी लपवत एकमेकाकड बघत होती. दुरून हे दृश्य पाहणारी शांताई संगी ला धीर देत म्हणाली, ‘’ जाऊ दे संगे आपला नशीबच असा वंगाळ आहे बघ आग तू काय आन इथ बसलेल्या सम्ज्द्या बाया काय आयुष्य भर ह्या वझ्याखाली दबणार बघ.नको इचार करूस पोर उपाशी असत्याल. जा घराला त्यास्नी खायला घाल.’’
धीर एकवटून पोरांना पोटाशी धरून संगी घराकड निघाली.जाता जाता थोडा तांदूळ डाळ मीठ मिरची आन रॉकेल घेऊन घरी आली. सुभ्याला ला आज पण खिचडीच खावी लागणार होती पण डोळ्यासमोर आपल्या आईचे दिसणारे रोज रोज चे हाल भूखेचा ज्वालामुखीला शमवत होते.रोज रोज असा हे गुलाम सारखा जगण संगीला नको नकोस झाला होता.आपल्या आणि आपल्या पिलांची पोटाची खळगी भरतांना खूप काही सहन कराव लागत होत.
संगी आन शालिनी सारख्या कित्येक स्त्रिया आज हि अस्तित्वाच्या लढाई च्या ओझ्या खाली दबल्या गेलेल्या आहेत.