बुधवार, ३ ऑगस्ट, २०१६

'पाउसवेडी'

काही झाड़ ही असतात
मानसांसारखी 'पाउसवेडी'
मनसोक्त ओत पोत
घेतात भिजुन गोडी गोडी
पावसाच्या काही पाउसखुना
झाडे स्वतः कड ठेवून घेतात
पाने ही हिरवा शालू नेसुन
हौस मौज भागवुन घेतात
कविमनाचा माणसाला खुनवते
पानावरची चार थेंबांची रांगोळी
मनाच्या पानावर लिहित जातो
भिजलेल्या चार ओळींची चारोळी.......
फोटो आणि कविता
~ मी१ पाऊसवेडा विव१
10.07.2016

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा